SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

जनप्रवास
महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत येत्या दीड महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यात संघर्ष तीव्र होणार आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत
जाण्यासाठी आता आजी-
माजी नगरसेवक व पदाधिकार्यांवर गळ टाकला जाणार आहेत. त्यांचे गट वाढविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. याचा फायदा मात्र भाजपला अधिक होणार आहे. शिवाय काँग्रेसला आपली ताकद दाखविण्यासाठी आतापासून कष्ट घ्यावे लागणार आहेत.
राज्यातील राजकारणात गेल्या चार वर्षांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणता पक्ष कोणाशी युती करेल? हे सांगणे देखील आता कठीण झाले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविली होती. त्यांना आव्हान देत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली आणि मनपा जिंकली देखील. शिवसेनेने देखील स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी झाली आणि सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपशी आघाडी केली आणि महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आता तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीसहून अधिक आमदारांसह थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याचा परिणाम आता सांगली महापालिकेच्या राजकारणावर होणार आहे.
सांगलीत राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. मात्र मिरज व कुपवाड शहरात राष्ट्रवादीची ताकद बर्यापैकी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना महापालिका क्षेत्रात मानणारा गट आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे पंधरा नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक आ.जयंत पाटील गटाचे आहेत. मात्र गेल्या चार दिवसात राज्यात झालेल्या घडामोडीने राष्ट्रवादीचे काही लोक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. अजितदादा पवार यांचे समर्थक देखील महापालिका क्षेत्रात आहेत. त्यामुळे माजी महापौर इद्रिस नायकवडी, विद्यमान नगरसेवक अतहर नायकवडी यांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्याबरोबर काही आजी-माजी नगरसेवक देखील त्यांच्याबरोबर असणार आहेत. दीड महिन्याने विद्यमान सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे नव्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात भाजप-अजितदादा (राष्ट्रवादी गट) निवडणूक लढणार आहे. त्यामुळे भाजपला फायदा अधिक होणार आहे. भाजपची मिरज शहरात ताकद वाढणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला आता मनपा क्षेत्रात पक्ष वाढीची चांगली संधी चालून आली आहे. यापूर्वी काँग्रेसवर राष्ट्रवादी अन्याय करत असल्याची भावना होती. आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक आजी-माजी पदाधिकारी देखील विखुरले जाणार आहेत. मनपा क्षेत्रातील अनेक प्रभागात काँग्रेसचे प्राबल्य आहेत.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या 20 जागा निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीबरोबर लढलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत काँग्रेसला फटका बसला होता. त्यामुळे भविष्यात होणार्या निवडणुकीसाठी काँग्रेसला आपली ताकद दाखवावी लागणार आहेत. राष्ट्रवादी बोलेल तसे काँग्रेसने आता चालता काम नये. मनपा क्षेत्रात पक्ष वाढीसाठी काँग्रेसने आतापासून मनपा क्षेत्रात कामाला लागणे आवश्यक आहे.
येणार महापालिका निवडणुकीतच सर्वांचा कस लागणार आहे. भाजपला अजित पवार गटामुळे भाजप खुशीत आहे तर राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे जयंत पाटील गट नाराज असणार आहे. काँग्रेसला मात्र यापुढे सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा