MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

देशमुखांचे काय चुकले ?

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे





सांगली : आटपाडी तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तसेच आटपाडीतील देशमुखांचा वाडाही बघण्यासारखा आहे. या वाड्याबद्दल लोकांमध्ये अजूनही अप्रुप आहे. स्व. बाबासाहेब देशमुख यांनी या वाड्यात बसून तालुक्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बाबासाहेब देशमुख यांच्या नंतर त्यांचे पुत्र राजेंद्रअण्णा आणि अमरसिंह देशमुख यांनीही वेळोवेळी आपली ताकद दाखविली आहे. स्व. बाबासाहेब देशमुख हे कधी आमदार झाले नाहीत. परंतु त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र राजेंद्रअण्णांनी 1995 मध्ये पूर्ण केले. राजेंद्रअण्णा अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळीपासून आटपाडीतील वाड्यातील देशमुखी राजकारण पुन्हा सुरू झाले. त्यानंतर अमरसिंह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. बँक, शिक्षण संस्था नावारूपाला आणले. परंतु कारखान्यामुळे ते गोत्यात आले. कारखान्याचे राजकारण करत असताना त्यांचे स्वत: चे राजकारण फसत गेले आणि एकामागून एक संस्था त्यांच्या ताब्यातून निघून गेल्या. आमदारकी गेली, जिल्हा बँकेचे संचालक पद गेले, मार्केट कमिटी गेली. परंतु देशमुखांना सर्वांत जास्त दुख झाले आहे ते स्व. बाबासाहेब देेशमुख यांनी स्थापन केलेली माणगंगा कारखानाही दुसर्‍याच्या ताब्यात देण्याची वेळ आली तेंव्हा. 

रस्तुमराव चित्रोजीराव उर्फ बाबासाहेब देशमुख. दादा या टोपन नावाने वाटचाल केलेल्या बाबासाहेबांना लोक सन्मानाने आदराने सरकार ही म्हणत. आटपाडीच्या भाग्यविधात्याने खरोखरच तालुक्याचे भाग्य बदलले. 

खानापूर, कडेगांव, आटपाडी अशा तीन तालुक्यांच्या एकत्र खानापूर पंचायत समितीचे पहिले सभापतीपद भूषविणार्‍या बाबासाहेब देशमुख यांनी सलग 17 वर्षे सभापतीपदी रहात त्यावेळी विक्रमच केला होता. स्वतंत्र आटपाडी तालुक्याची निर्मिती, स्वतंत्र एस.टी. डेपोचे निर्माण स्वतंत्र मार्केट कमेटी, खरेदी विक्री संघ, 3 जिल्ह्यात विस्तारलेले शैक्षणिक विश्वाचे जाळे आणि माणगंगा सह .साखर कारखाना पूर्णत्वास नेले. 

1978 मध्ये विधानसभेला स्व. बाबासाहेब देशमुख यांचा पराभव झाला होता. परंतु हा पराभवाचा डाग त्यांनी 1980 मध्ये विट्याच्या हणमंतराव पाटील यांना निवडून आणून पुसून टाकला. संपतरावनाना माने यांच्या साम्राज्यात बाबासाहेब देशमुखांनी हणमंतराव पाटील साहेबांच्या रूपाने वादळात दीपा लावला होता. 

1995 मध्ये आमदार झाल्यानंतर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी स्व. बाबासाहेब देशमुख यांनी तयार केलेल्या सहकारी संस्था वाढविण्याचा, टिकविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. कायमची दुष्काळी परिस्थिती, त्यामुळे उसाची - कमरतता, राजकारणात होत गेलेला विरोध अशा अनेक कारणांनी कारखाना बंद पडला. 1995 नंतर राजेंद्रअण्णा यांनी कधीच परत संधी मिळाली नाही. देशमुखांची ताकद कमी झाली असे  लोक जरी म्हणत असले तरी देशमुखांकडे उपयुक्त आणि उपद्रव्य हे दोन्ही मूल्ये आहेत. त्यांच्या जिवावर अनेकांनी आमदारकी भोगली.

माणगंगेच्या स्थापनेपासून कारखाना देशमुखांकडे होता. माण, आटपाडी आणि सांगोला या तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यात पहिल्यापासून  आटपाडीचे देशमुख आणि सांगोल्याचे स्व. गणपतराव देशमुख यांचे समजोत्याचे राजकारण होत होते. सांगोला तालुक्यालाही काही जागा कायमच या कारखान्यात ठेवले जात होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र आर्श्चय झाले. कायम सोबत असलेले सांगोल्याचे देशमुखांनी आयत्यावेळी साथ सोडली. त्यांनी त्यांचे पाच अर्ज माघारी घेतली. त्यामुळे राजेंद्रअण्णांचा नाईलाज झाला. त्यामुळे त्यांनी राहिलेले सर्व अर्ज माघारी घेतले आणि कारखाना तानाजी पाटलांच्या ताब्यात गेला.  

राजकारण करीत असताना देशमुख गटाच्याही काही चुका झाल्या आहेत. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळी त्यांनीही स्वतकडे आलेल्या राष्ट्रवादीचे एबी फॉर्म कुणाला दिलेच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला आटपाडीत नामुष्की पत्करावी लागली. देशमुख सध्या भाजपमध्ये आहेत. परंतु तालुक्यातील भाजप एकदिलाचे त्यांच्यासोबत नाही. अनिल बाबर, सदाशिवराव पाटील, कदम गट, राष्ट्रवादी याच्याबरोबत त्यांची सध्यातरी दुष्मनी आहे. सध्याच्या आघाडीच्या राजकारणात केवळ स्वत:च्या जिवावर राजकारण करणे देशमुखांना आता सोपे नाही. त्यामुळे त्यांनी आता गतकाळात झालेल्या चुका सुधारून सावधपणे पावले टाकली तरच आटपाडीच्या वाड्याला पुन्हा सुगीचे दिवस येतील यात काही शंका नाही..

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी